मिर्झापूर: सोशल मीडियावर पंतप्रधान यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी आणि त्यांच्या व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. उत्तर प्रदेशातील येथे हा तरूण नोकरी करतो. पोलिसांच्या माहितीनुसार, २० सप्टेंबरला रात्री कटरा परिसरातील तरूण सोनू खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. तसेच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मंगळवारी त्याला अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. आरोपीकडील मोबाइल जप्त करण्यात आला आहे. मूळचा चंदौली येथील राहणारा सोनू खान हा जल प्राधिकरणात नोकरी करत होता. मात्र, भरती रद्द झाल्यानं तो मिर्झापूर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. आणखी बातम्या वाचा: