नवी दिल्ली : मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, करोना संक्रमित रुग्णांचा आकडा ५५ लाखांच्या पुढे गेलाय. प्रत्येक दिवशी जवळपास ९५ हजार संक्रमित सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली होती. पण हाच आकडा आता ७५ हजारांवर आल्यानं प्रत्येक दिवशीचा संक्रमितांचा आकडाही घसरताना दिसतोय. गेल्या २४ तासांत ७४ हजार ९०३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ०५३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. यासोबतच देशातील एकूण ५५ लाख ६२ हजार ४८३ वर पोहचलाय. तर देशातील एकूण करोना मृत्यूचा आकडा ८८ हजार ९३५ वर पोहचलाय. वाचा : वाचा : वाचा : गेल्या २४ तासांत जवळपास १ लाख ०१ हजार ४६८ रुग्णांनी करोनावर मात केलीय. त्यामुळे आत्तापर्यंत करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या जवळपास पोहचलीय. आत्तापर्यंत देशातील ४४ लाख ९७ हजार ८६७ जणांनी करोनावर विजय मिळवलाय. देशाचा (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) ८०.८६ टक्क्यांवर आहे. सध्या १७.५४ टक्के अर्थात ९ लाख ७५ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील मृत्यू दर १.५९ टक्क्यांवर आहे तर (एकूण चाचण्यांपैंकी पॉझिटिव्ह आढळलेली संख्या) ८.०२ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासांत देशात ९ लाख ३३ हजार १८५ सॅम्पल्सच्या चाचण्या पार पडल्या. यासोबतच देशात आत्तापर्यंत एकूण ६ कोटी ५३ लाख २५ हजार ७७९ सॅम्पसची चाचण्या पार पडल्या आहेत. वाचा : वाचा : वाचा :