पुणे: हिंजवडी आयटी पार्कमधील हॉटेलातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 30, 2020

पुणे: हिंजवडी आयटी पार्कमधील हॉटेलातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

https://ift.tt/3jgFBUV
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: आयटी पार्कमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहे. चार महिलांची सुटका करण्यात आली असून, इतर चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेश कैलास पवार (वय २०, रा. हॉटेल ग्रॅन्ड मन्नत, येळवंडे वस्ती, हिंजवडी, . मूळ रा. औरंगाबाद), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसूफ शेख, हिरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. हॉटेलमध्ये असलेल्या चार तरुणींची सुटका करून, त्यांना रेस्क्यू फाऊंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे. आरोपींनी इंटरनेटवर एस्कॉर्ट सेर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतःचे व्हॉट्सअॅप क्रमांक प्रसारित केले होते. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ते तरुणींचे फोटो पाठवायचे व त्या ठिकाणी सौदा झाल्यावर ग्राहकास हॉटेलचा पत्ता देत होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.