
हैदराबाद- बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची तब्येत गेल्या २४ तासांपासून अधिक खालावली आहे. गुरुवारी इस्पितळाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या हेल्थ बुलेटिनमध्ये इस्पितळाने स्पष्ट केलं की, 'गेल्या २४ तासांत त्यांची तब्येत खालावली. त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. एमजीएम हेल्थकेअरमधील तज्ज्ञांची टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. नुकतेच एसपी बालसुब्रमण्यम यांचा मुलगा चरण यांनी एक व्हीडिओ शेअर करत आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसतं नसून ते आता ठीक आहेत असं सांगितलं होतं. मात्र चरण यांनी पुढे स्पष्ट केलं की, करोनाशिवायही त्यांना अन्य आरोग्याशी निगडीत समस्या आहेत आणि त्या अजून सुधारू शकलेल्या नाहीत. आढळल्यानंतर एसपी बालसुब्रमण्यम ऑगस्ट महिन्यात स्वतः इस्पितळात दाखल झाले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत चढ- उतार होत राहिले होते. आता त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे.