एका मागोमाग एक मंत्र्याला करोनाची लागण; उदय सामंत यांनाही बाधा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 29, 2020

एका मागोमाग एक मंत्र्याला करोनाची लागण; उदय सामंत यांनाही बाधा

https://ift.tt/3jiVXMU
मुंबई: राज्य सरकारमधील मंत्र्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा सिलसिला सुरूच आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सामंत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 'गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. नुकतीच कोविड टेस्ट करून घेतली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेले दहा दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईन, असं सामंत यांनी म्हटलं आहे. करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं राज्यात उच्च शिक्षणाचा प्रश्न जटील बनला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापले होते. या संपूर्ण काळात उदय सामंत हे सातत्यानं राज्यभरात फिरत होते. त्यातून त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले होते व खबरदारी म्हणून कोविडची चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे. वाचा: आतापर्यंत राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख. सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. वाचा: