
मुंबई- बंगाली सिनेमांतील अभिनेत्री आणि बशीरहाट येथील तृणमूल कॉंग्रेसची खासदार हिला ऑनलाइन जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी नुसरतने देवी दुर्गेच्या रूपात एक फोटोशूट केलं होतं. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर नुसरत धार्मिक द्वेषाची बळी ठरली आणि लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी नुसरतला जीवे मारण्याची धमकीही दिली. मुस्लिम कुटुंबात जन्मल्यानंतर नुसरतने निखिल जैन या हिंदूशी लग्न केल्यानंतर अनेकदा तिला अशा पद्धतीच्या धमक्या मिळत राहिल्या आहेत. नुसरतने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला हिंदू आडनाव ठेवण्याचा सल्ला दिला. नुसरतने हे फोटोशूट महालयाच्या निमित्ताने म्हणून केले होते. याचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केले होते. यानंतरच मुस्लिम असून हिंदू देवीचं फोटोशूट केल्याबद्दल तिची टीका केली जाऊ लागली. नुसरतच्या फोटोवर भाष्य करणाऱ्या एका यूझरने धमकी देण्याच्या हेतून लिहिले की, 'तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. अल्लाहची भीती बाळग. तू तुझं शरीर झाकून ठेवू शकत नाहीस का? छी.. ! दुसर्या यूझरने कमेन्टमध्ये लिहिले की, 'तू तुझं नाव नुसरत जहां बदलून नूसू दास, घोष किंवा सेन असं काहीही ठेव.'