अमेरिकेतील निवडणुकीत PM मोदींचे मित्र पराभवाच्या छायेत? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 21, 2020

अमेरिकेतील निवडणुकीत PM मोदींचे मित्र पराभवाच्या छायेत?

https://ift.tt/2EnzTBs
वॉशिंग्टन: नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात जो बायडन यांना सर्वाधिक मतदारांची पसंती असल्याचे समोर आले आहे. एबीसी न्यूज-वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या सर्वेक्षणात बायडन यांनी मोठी आघाडी घेतली आहे. बायडन यांना ५७ टक्के आणि ट्रम्प यांना ४१ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. मिनेसोटामध्ये ही बायडन यांना आघाडी आहे. ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात मिनेसोटामध्ये आघाडी घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रचारासाठी मोठा निधीही गुंतवला आहे. ट्रम्प यांना या ठिकाणाहून १.५ गुणांनी पराभव स्विकारावा लागला होता. वाचा: 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी मागील निवडणुकीत विजय मिळवलेल्या काही राज्यामध्ये सध्या बायडन यांची आघाडी आहे. यामध्ये अॅरिजोना, मिशिगन, पेन्सिलवेनिया, विस्कॉन्सिन या राज्यांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांनी विजय मिळवलेल्या राज्यांचा समावेश केल्यास बायडन यांच्याकडे २९० इलेक्टोरल व्होट होतील. फ्लोरीडा आणि उत्तर कॅरिलोना सारख्या राज्यातही बायडन यांना आघाडी आहे. या राज्यांचाही समावेश केल्यास त्यांच्याकडे ३३० इलेक्टोरल व्होट होतील. वाचा: बायडन आघाडीवर जॉर्जिया, आयव्होवा, ओहायो आणि टेक्साससारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार होणार आहे. या ठिकाणीदेखील बायडन यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याठिकाणीही बायडन विजयी झाल्यास ३४० इलेक्टोरल व्होट होतील. या चारही राज्यात बायडन विजयी झाल्यास इलेक्टोरल व्होटची संख्या ४०० हून अधिक होऊ शकते. FiveThirtyEight मॉडेलनुसार, बायडन यांच्याकडे ३४० इलेक्टोरल व्होट जिंकण्याची शक्यता ४५ टक्के आहे. तर, ट्रम्प विजयी होण्याची शक्यता २५ टक्के इतकी आहे. वाचा: वाचा: ट्रम्प यांच्याकडून प्रचारासाठी जोर डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील प्रचारासाठी जोर लावला आहे. ट्रम्प यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरीक मतदारांसह इतरही मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वर्णद्वेषी आंदोलकांवरही त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. बायडन सत्तेवर आल्यास चीन अमेरिकेवर वर्चस्व गाजवेल असा आरोपही त्यांनी केला आहे. भारतीय मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. जवळपास २० लाख अमेरिकन-भारतीय मतदान करणार आहेत. त्यांनाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी सुरू केला आहे. अमेरिकन-भारतीय मतदारांमध्ये ट्रम्प यांना पसंती दिली जात असली तर बायडन आघाडीवर आहे.