पोलिसांना गुंगारा देत मनसेच्या नेत्यांनी केला लोकल प्रवास - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 21, 2020

पोलिसांना गुंगारा देत मनसेच्या नेत्यांनी केला लोकल प्रवास

https://ift.tt/2RLlRMU
मुंबई: मुंबईतील कष्टकरी व नोकरदारांच्या सोयीसाठी रेल्वे सेवा सुरू करा अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आज सविनय कायदेभंग आंदोलन केले. आधीच जाहीर केल्यानुसार मनसेच्या काही नेत्यांनी आज पोलिसांना गुंगारा देत लोकलमध्ये प्रवेश मिळवला आणि प्रवासही केला. हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा मनसेनं केला आहे. वाचा: करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील लोकल सेवा बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकल प्रवासाची मुभा आहे. त्याचा प्रचंड ताण बेस्ट बस सेवेवर पडत आहेत. बसमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळं करोना संसर्ग रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. हाच मुद्दा उपस्थित करत मनसेनं लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी प्रशासनाला एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, रेल्वे प्रशासनानं त्याकडं दुर्लक्ष केलं. त्याचा निषेध म्हणून मनसेनं आज सविनय कायदेभंग आंदोलन केलं. वाचा: मनसेचे सरचिटणीस यांच्यासह अन्य काही नेत्यांनी रेल्वेनं प्रवास केला. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसेचे नेते आंदोलनावर ठाम होते. त्यानुसार आज सकाळी पोलिसांची नजर चुकवून मनसेचे नेते लोकलमध्ये बसले. 'सातत्यान सरकारला विनंती करूनही आमचं ऐकलं गेलं नाही. त्यामुळं सरकारच्या नाकावर टिच्चून आम्ही आज कायदेभंग केला आहे,' असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. मुंबई डबेवाला असोसिएशन, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनंही (महासंघ) या आंदोलनास पाठिंबा दिला होता.