सॅल्यूट! पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण वाचविले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 3, 2020

सॅल्यूट! पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण वाचविले

https://ift.tt/3cRREp6
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई आत्महत्या करण्यासाठी टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या २० वर्षीय तरुणीचे प्राण मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखून वाचविले. अंधेरीच्या कोलडोंगरी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. तरुणीला आत्महत्येपासून प्ररावृत्त करणाऱ्या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अंधेरीच्या कोलडोंगरी मध्ये राहणारी २० वर्षी सरिता (बदलेले नाव) महाविद्यालयात शिकते. घरगुती कारणावरून तिचे कुटुंबियांशी भांडण झाले आणि या रागातून सरिता आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर जाऊन बसली. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली. अंधेरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, भिंगर्दीवे, थिटे आणि सोनिया साळवी हे घटनास्थळी पोहोचले. प्रवीण जाधव यांनी सरिता हिला बोलण्यात गुंतवून ठेवत तिच्या जवळ पोहोचले आणि संधी मिळताच तिला कठड्यावरून आत खेचले. पोलिसांनी दाखविलेला संयम आणि प्रसंगावधान यामुळे सरिता हिचे प्राण वाचले.