RR vs RCB: IPL मध्ये आज डबल हेडरचा धमका: कोणाचे पारडे जड, जाणून घ्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 3, 2020

RR vs RCB: IPL मध्ये आज डबल हेडरचा धमका: कोणाचे पारडे जड, जाणून घ्या

https://ift.tt/30tLEOA
अबुधाबी: IPL 2020 २०२० मध्ये आज प्रथमच डबल हेडरचा धमाका पाहायला मिळणार आहे. डबल हेडर म्हणजे एकाच दिवशी दोन लढती होय. यातील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या २१ सामन्यात राजस्थानने १० तर बेंगळुरूने ८ मध्ये विजय मिळवला आहे. तीन सामने अनिर्णित झालेत. आता आजच्या सामन्यात कोणाचे पारडे जड आहे हे जाणून घेऊयात. राजस्थान रॉयल्सने ३ पैकी २ विजय तर एक पराभव आणि बेंगळुरूने देखील ३ पैकी २ मध्ये विजय आणि १ सामन्यात पराभव स्विकारला आहे. हे दोन्ही संघ गुणतक्त्यात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. वाचा- गेल्या सामन्यात बेंगळुरुने अनेक चुका केल्या पण मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याने त्याच विराट संघाने बाजी मारली. मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीने म्हटले होते की, जर कॅच धरले असते तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला नसता. मुंबईविरुद्ध मिळालेल्या आत्मविश्वासाचा वापर राजस्थानविरुद्ध करावा लागेल. राजस्थानचा फॉर्म चांगला या स्पर्धेत आतापर्यंत राजस्थानने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात भलेही त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांची कामगिरी फार खराब झाली नाही. संघात कर्णधार स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोस बटलर या तिघांनी दमदार फलंदाजी केली आहे. वाचा- अर्थात या तीन फलंदाजानंतर कोण हा प्रश्न राजस्थानसमोर आहे. एका सामन्यात राहुल तेवतियाने चमत्कार केला होता. त्याने एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार मारून विजय मिळवून दिला. मधळ्याफळीतील रॉबिन उथप्पा अद्याप अपयशी ठरला आहे. रियान पराग देखील धावा करू शकला नाही. टॉम कुरनने फक्त एकदा अर्धशतक केले. वाचा- गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि करन यांच्यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. बेंगळुरूला दिलासा बेंगळुरू संघात या वर्षी एक चांगला बदल दिसून येतोय. तो म्हणजे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर फक्त संघ अवलंबून नाही. तर देवदत्त पडिक्कल आणि एरॉन फिंच सारखे खेळाडू देखील चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत फक्त विराटच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. आजच्या सामन्यात विराटला धावा करण्याची संधी आहे. राजस्थानसाठी धोकादायक गोलंदाज म्हणजे युजवेंद्र चहल होय.