'जे पाकिस्तानात घडते, तेच उत्तर प्रदेशात घडले, पण...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 4, 2020

'जे पाकिस्तानात घडते, तेच उत्तर प्रदेशात घडले, पण...'

https://ift.tt/30tSxPG
मुंबई: 'हिंदू मुलींना पळवून बलात्कार व हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले. पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही,' अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ''तील लेखात संजय राऊत यांनी हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व खुनाच्या प्रकरणावर परखड भाष्य केलं आहे. कंगना राणावत, सुशांतसिंह राजपूत या नटनट्यांच्या प्रकरणावरून आरडाओरड करणाऱ्यांवर राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. 'मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक हाथरसमधील पीडितेच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी ‘बचाव… बचाव’ असा आक्रोश करीत तडफडून मेली. मनीषाला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. हिमाचलच्या एका नटीच्या बेताल वक्तव्यामागे, बेकायदेशीर कृत्यांमागे जे महान महात्मे उभे राहिले ते हाथरस प्रकरणात साफ अदृश्य झाले. अनेक महिला नेत्या, त्यांच्या संस्था आणि संघटना जणू मूकबधीर होऊन बसल्या आहेत. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढ्यात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती,' असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे. 'हाथरसमधील पीडिता ड्रग्ज घेत नव्हती. ती स्टार किंवा सेलिब्रेटी नव्हती. ती झोपडीत राहत होती व तिने कोट्यवधी रुपये खर्च करून कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले नव्हते. तिचे कोणाबरोबर ‘अफेयर’ नव्हते. ती एक साधी सरळ मुलगी होती. त्यामुळे तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर चिता पेटवून राख करण्यात आली. हे सर्व यांच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हाथरसला वेगळे काय घडले?,' असा रोखठोक सवाल राऊत यांनी केला आहे. महिलांना न्याय त्यांचे समाजातील स्थान पाहून मिळतो काय? देशातल्या मीडियावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे प्रकरण आहे. कंगना प्रकरणात महिनाभर संपूर्ण मीडियास ‘न्याय द्या’ या प्रेरणेने पछाडले होते. सुशांत आत्महत्या प्रकरणात तेच घडले; पण हेच कोकलणारे लोक ‘हाथरस’ प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाला, केंद्र सरकारला, योगी सरकारला प्रश्न विचारताना दिसत नाहीत. २०१२ साली दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडले तेव्हा संपूर्ण भाजपा रस्त्यावर उतरला होता. संसद बंद पाडली होती. मीडियाने निर्भयासाठी ‘न्याय’ देणारी यंत्रणाच उभारली होती. निर्भया तेव्हा सगळ्यांचीच बहीण व मुलगी झाली. मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली? की ती दलित असल्यामुळेच न्यायापासून वंचित राहिली? हाथरसची दलित कन्या मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला; तेव्हा आयुष्यमान आठवले नट्यांच्या घोळक्यात होते. देशातील दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस आहे,' अशी तोफ राऊत यांनी डागली आहे.