मराठा आरक्षण: विखे-पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 30, 2020

मराठा आरक्षण: विखे-पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

https://ift.tt/35Pfn6a
म.टा.प्रतिनिधी, नगर ‘सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणाऱ्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतयं, हे दुर्देव आहे,’ असे वक्तव्य माजी मंत्री यांनी करतानाच मराठा आरक्षणावरून राज्य सरकावर निशाणा साधला. ‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी धरसोड झाली, त्याचा परिणाम म्हणजे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. आता पाच न्यायमूर्तींच्या बेंचपुढे हे प्रकरण जाणार आहे. परंतू मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन यामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तरच सरकार वटणीवर येईल,’ असेही ते म्हणाले. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत बोलताना विखे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाही. मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती नेमली होती. परंतु या समितीतील सदस्यांना किती गांर्भिय आहे ? कारण ते बैठकांना हजर नव्हते. आरक्षणाच्या बाबतीत सध्या काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, हे त्यांना माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयात जे सरकारने विशेष वकिल नेमले आहेत, त्यांना फी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. फी ची तरतूद सरकार करू शकले नाही. सरकार हे वेळकाढूपणा करीत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, त्यांना आरक्षण द्यायचे नाही.’ यावेळी बाबत देखील विखे यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘कांदा निर्यातबंदी उठवणे किंवा लावणे, हे आज धोरण घेतले नाही. शरद पवार यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. केंद्र सरकार याला जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पण पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना त्याच्या काळात किती वेळा कांदा निर्यातबंदी करावी लागली, याची त्यांना आठवण कोणीतरी करून दिली पाहिजे. सरकारला त्या-त्या परिस्थितीमध्ये काही निर्णय करावे लागतात, त्यांना याची कल्पना आहे. त्यामुळे केंद्रावर आरोप करून चालणार नाही. निर्यातबंदी करू नये, ही आमची देखील मागणी होती. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला निर्यातबंदी करावी, ही भूमिका नसावा, या मताचा मी आहे.’ व्यक्तीगत भूमिकेवर भाष्य नको ज्येष्ठ नेते यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांचे काल, बुधवारी पंकजा मुंडे यांनी कौतुक केले. याबाबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, ‘राजकीय निर्णय होतात, त्यामध्ये प्रत्येकाची भूमिका असते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीगत भूमिकेवर आपण भाष्य करणे योग्य नाही,’ असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.