'मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल मृतावस्थेकडे' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 10, 2020

'मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल मृतावस्थेकडे'

https://ift.tt/3nDFZPZ
पंढरपूरः 'देशात सध्या जे काही सुरू आहे. त्यावरून देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे,' अशी खरमरीत टीका माजी केंद्रीय गृहमंत्री यांनी मोदी सरकारवर केली आहे. देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. देशहितासाठी आता सगळया विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही शिंदे यांनी सांगितले. करोनामुळे निधन झालेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना शिंदे यांनी आज भेट दिली. करोनाकाळात बाहेर न पडलेले शिंदे आज पहिल्यांदा सुधाकरपंत परिचारक यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचे सांत्वन केले. यानंतर भगताचार्य वा ना उत्पात , वारकरी संत रामदास महाराज जाधव आणि राष्ट्रवादीचे नेते कै राजूबापू पाटील यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या. 'मोदी सरकारच्या काळात देशाची आर्थिक स्थिती विदारक बनत चालली असून हाथरस सारख्या घटनेवरून दलित आणि महिलांवर वाढत चाललेले अत्याचार देशाची चिंता वाढवणारे आहेत,असे शिंदे यांनी सांगितले. सुशांत प्रकरणात सोशल मिडीयातून काही फेक अकाऊंट बनवून मुंबई पोलीसांची बदनामी केली. सोशल मिडीयाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला होता याची आठवण सांगताना 'मी न बोललेल्या वक्तव्याची मला माफी मागावी लागल्याचे,' शिंदे यांनी सांगितले. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने होणे आवश्यक असल्याचे मतही शिंदे यांनी व्यक्त केले. सध्या सुरु असलेल्या आरक्षण प्रश्नावर बोलताना काही मंडळी भडक विधाने करून समाजात फूट पडत असले तरी मराठा समाजाला आरक्षणास आपला पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाजप नेते राज्यात सत्तेत येणार असल्याची वक्तव्य करीत असल्याकडे लक्ष वेधले असता भाजपावाल्याना स्वप्ने बघण्याची सवय आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.