पुणे विमानतळावरील रात्रीच्या विमान सेवेला ब्रेक ; 'हे' आहे त्यामागचे कारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 7, 2020

पुणे विमानतळावरील रात्रीच्या विमान सेवेला ब्रेक ; 'हे' आहे त्यामागचे कारण

https://ift.tt/3iDgsTd
मुंबई : पुण्यासाठी पुढील वर्षभरात विमान प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ही माहिती आधी करून घ्यावी लागेल. कारण पुढील वर्षभर पुणे विमानतळावरील रात्रीची विमान सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यामळे रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीत सध्याच्या वेळापत्रकानुसार जवळपास १३ फ्लाईट्सवर याचा परिणाम होणार आहे. या फ्लाईट्सला दिवसभरातीस वेळापत्रकात स्लाॅट दिले जाण्याची शक्यता आहे. पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे काम या महिनाअखेर हाती घेण्यात येणार आहे. धावपट्टीवर कार्पेटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने २६ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी रात्रीची विमानसेवा स्थगित केली आहे. रात्रीच्या विमान सेवांच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यात येईल, असे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे. येत्या २६ ऑक्टोबरपासून हवाई दलाकडून विमानतळाच्या धावपट्टीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुढील वर्षभर हे काम चालणार आहे. त्यामुळे रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीत सर्व १३ विमानांना दिवसाच्या वेळापत्रकात सामावून घेतले जाणार आहे. नुकताच यासंदर्भात एअरपोर्ट ऍडव्हायजरी कमिटीची खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात रात्रीच्या विमानांना दिवसभरातील वेळापत्रकात स्लॉट देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोव्हीड-१९ ची सोशल डिस्टंसिंगची नियमावलीचे विमानतळावर पालन केले जात आहे. रात्रीची सेवा स्थगित केली असली तरी यातील कोणतीही सेवा रद्द होणार नाही, अशी ग्वाही विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी दिली. ते म्हणाले की, आमच्याकडे आता दिवसाचे १२ तास आहेत. त्यात सोशल डिस्टंसिंगचे पालन करून विमानांचे सुधारित वेळापत्रक तयार करावे लागेल. त्यामुळे नव्या विमान सेवांसाठी नवा स्लॉट उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे, असे त्यांनी सांगितले. कार्गो सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याला प्राधान्य पुणे विमानतळावर कार्गो सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याला प्राधान्य आहे. इथल्या व्यापाऱ्यांची मालाची मागणी पूर्ण करणे अशक्य असल्याने इथं कार्गो क्षमता वाढवली जाईल, असे खासदार बापट यांनी सांगितले. सध्या विमान सेवा मर्यादित असल्याने पुणे विमानतळाला दररोज २.५ कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचे कुलदीप सिंग यांनी सांगितले. सध्या विमानतळावर एका तासाला चार विमानांना उतरण्यास आणि उड्डाण घेण्यास परवानगी आहे. त्यामुळे १२ तासात ४८ विमाने हाताळण्याचे आव्हान आहे. सध्या या स्लॉटमध्ये विमानतळावर ४२ फ्लाईट्स हाताळली जात आहेत, असे सिंग यांनी सांगितले.