फारूख अब्दुल्लांचे वक्तव्य देशद्रोही; ते आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 12, 2020

फारूख अब्दुल्लांचे वक्तव्य देशद्रोही; ते आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू'

https://ift.tt/33RMLcS
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फारूख अब्दुल्ला यांनी कलम ३७० संदर्भात केलेले वक्तव्य हे देशाच्या हिताचे नसून ते आहे, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. फारूख अब्दुल्ला हे चीनच्या मानसिकतेला योग्य ठरवण्याचे काम करत असून त्यांचे वक्तव्य चिंतनीय आणि निंदनीय आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. चीनच्या मानसिकतेला फारूख अब्दुल्ला योग्य ठरवत असून त्यांना चीनच्या मदतीने जम्मू आणि काश्मीरमध्ये हटवणयात आलेले ३७० कलम पुन्हा लागू करायचे आहे. फारूख अब्दुल्ला यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी म्हटले आहे. भविष्यात जर आम्हाला संधी मिळाली, तर चीनच्या मदतीने आम्ही काश्मीमध्ये कलम ३७० लागू करू असे वक्तव्य त्यांनी केले असून त्यांचे हे वक्तव्य देशद्रोही असल्याचे पात्रा म्हणाले. देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करणे, देशाच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावणे एखाद्या खासदाराला शोभते का, असे प्रश्न उपस्थित करत पात्रा यांनी ही देशविरोधी वक्तव्य नाहीत का, अशी विचारणा केली आहे. फारूख अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत, असा दावा केला होता. इतकेच नाही तर, काश्मीर स्वत:ला भारतीय मानत नाही आणि त्याला भारतीय व्हायचे देखील नाही. त्या ऐवजी चीनने काश्मीरवर शासन करावे असे आपल्याला वाटत असल्याचे फारूख अब्दुल्ला यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्याचा समाचार भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. वाचा- 'राहुल आणि फारूख एकाच नाण्याच्या दोन बाजू' केवळ फारूख अब्दुल्ला असे बोलतात असे नव्हे, तर राहुल गांधी देखील अशीच वक्तव्ये करत असतात, असे पात्रा म्हणाले. या दोघांची वक्तव्ये पाहिली असता दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसते अशी टीकाही पात्रा यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना डरपोक म्हटले. दुसऱ्या देशांची प्रशंसा आणि आपल्या पंतप्रधानांवर टीका हे योग्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी पाकिस्तानचे हिरो बनले होते, आज फारूख अब्दुल्ला हिरो बनत आहेत, असे पात्रा पुढे म्हणाले. वाचा- वाचा-