१४ दिवसांचे मूल घेऊन कार्यालयात रुजू; IAS सौम्या यांचं सर्वत्र कौतुक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 13, 2020

१४ दिवसांचे मूल घेऊन कार्यालयात रुजू; IAS सौम्या यांचं सर्वत्र कौतुक

https://ift.tt/356K5aX
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील मोदीनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी आयएएस () यांना करोनाचा कहर () सुरू असतानाच गोड मुलीला जन्म दिला. मात्र या कर्तव्यदक्ष महिलेने करोनासारख्या कठीण काळातील आपली जबाबदारी समजून प्रसूतीनंतर २२ दिवसांनी कार्यालयात पोहोचून आपले काम सुरू केले. स्वत:ची काळजी घेत घेत आपल्या चिमुकलीची देखील काळजी घेत सौम्या पांडेय आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मूळच्या प्रयागराजला राहणाऱ्या सौम्या पांडेय या २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या गाझियाबादमध्ये मोदीनगर उपविभागीय दंडाधिकारी या पदावर त्या काम करत आहेत. सौम्या पांडे यांनी नियुक्तीनंतर करोनाकाळात अतिशय उत्तम काम केले. त्यांनी या दरम्यान एका मुलीला जन्म दिला. सौम्या यांनी मुलीला जन्म दिल्यानंतर केवळ १४ दिवसाचीच रजा घेतली आणि पुन्हा त्या कर्तव्यावर रुजू झाल्या. आता आपल्या कार्यालयात त्या आपल्या मुलीला मांडीवर घेत काम करताना दिसत आहेत. मुलीवर लक्ष ठेवून बाळगतात सावधगिरी ज्या पदावर माझी नियुक्ती करण्यात आली आहे त्याला न्याय देणे मी माझे कर्तव्य समजते असे आयएएस सौम्या पांडेय म्हणाल्या. करोनाच्या काळात देखील त्यांनी अनेक रुग्णालयांचे दौरे केले आहेत. चा काळ असल्याने त्या आपल्या नवजात मुलीची विशेष काळजी घेताना दिसतात. सर्व फाइल्स देखील त्या पुन्हा पुन्हा सॅनिटाइझ करतात. क्लिक करा आणि वाचा- गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने दिली मोठी साथ- सौम्या पांडेय मी गर्भवती असल्यापासून आतापर्यंत गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने मोठे सहकार्य केले असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील मला उत्तम सहकार्य केल्याचे त्या म्हणाल्या. म्हणूनच आता माझे हे कर्तव्य आहे की आईचा धर्म पाळत जबाबदारी देखील तितकीच पार पाडावी असे मला वाटते, असेही सौम्या पांडेय म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-