धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अल्पवयीन विद्यार्थी, गुजरातमधून केली अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 12, 2020

धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अल्पवयीन विद्यार्थी, गुजरातमधून केली अटक

https://ift.tt/3jQMZGX
नवी दिल्ली: आयपीएल २०२० मध्ये कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खराब झाल्याने नाराज होऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी गुजरातमधील कच्छमधून अटक केली आहे. वाचा- आयपीएलमध्ये आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला असता पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही युजर्सनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला. यात एका व्यक्तीने धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा मेसेस सोशल मीडियावरून शेअर केला होता. वाचा- या प्रकरणी धोनीच्या कुटुंबियांची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी रातू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आयपी आयडीच्या आधारावर संबंधित कमेंट करणाऱ्या युझरचा शोध सुरू केला. त्याच बरोबर धोनीच्या रांची येथील घराबाहेरची सुरक्षा वाढवली होती. वाचा- गुजरात पोलिसांनी कच्छमधून एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याला लवकरच रांची पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. संबंधित मुलाला सोशल मीडिया कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. संबंधित मुलगा १२वी शिकत आहे. त्याला मुंद्राच्या नामना कपाया गावातून अटक केली. रांची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात पोलिसांनी सगीर नावाच्या मुलाला अटक केली. त्याला लवकरच आमच्या ताब्यात घेतले जाणार आहे. वाचा- आयपीएलमध्ये CSK ची खराब कामगिरीनंतर धोनीची पत्नी साक्षीच्या इस्टाग्रामवर संदर्भात आक्षेपार्ह कमेंट केली गेली होती. यावर धोनीचे चाहते आणि देशभरातून नारजी व्यक्त करण्यात आली.