पुढच्या ८ तासांची तयारी करा; मुंबईतील रुग्णालयांना महत्त्वाचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 12, 2020

पुढच्या ८ तासांची तयारी करा; मुंबईतील रुग्णालयांना महत्त्वाचे आदेश

https://ift.tt/30XUnJ1
मुंबईः मुंबईत गेल्या १ तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा बंद झाल्यानं जवळपास संपूर्ण शहराची वीज गेली आहे. याचा परिणाम रुग्णालय, लोकलसेवा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर झाला आहे. करोनाची परिस्थीत वीज पुरवठा खंडित झाल्यानं अधिक चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी रुग्णालयांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर चहल यांनी कोव्हिड सेंटर व इतर रुग्णालयांमध्ये डिझेल जनरेटर आणि बॅकअपचा पर्याय वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे बॅकअप जवळपास ८ तासांपर्यंत सुरू राहू शकतात. असंही त्यांनी सांगितलं आहे.