पंतप्रधान मोदींनी केली महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेची सुरुवात; म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 11, 2020

पंतप्रधान मोदींनी केली महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेची सुरुवात; म्हणाले...

https://ift.tt/2SLPJsY
नवी दिल्ली: यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केल्यानंतर सुमारे १ लाख लोकांना वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल. पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेमुळे ६ राज्यांमधील ७६३ पंचायतींच्या एक लाख लोकांना लाभ मिळणार आहे. यात उत्तर प्रदेशातील ३४६, हरयाणातील २२१, महाराष्ट्रातील १००, मध्य प्रदेशातील ४४, उत्तराखंडातील ५० आणि कर्नाटकातील २ पंचायतींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केल्यानंतर ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असा लोकांची वार्तालाप केला. या दरम्यान आता आपल्या संपत्तीवर कोणीही वाकडी नजर ठेवू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे आता लाभार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मजबुती मिळाली आहे, अशी लाभार्थ्यांची भावना असल्याचे लाभार्थी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या कार्डाद्वारे आता आम्हाला बँकांकडून कर्ज मिळवणे अगदी सहज सोपे झाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांच्यासी वार्तालाप करताना लाभार्थी म्हणाले. या बरोबरच गावांमधील संपत्तीचा वादही आता संपुष्टात आल्याचे ते म्हणाले. आज ज्या १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे, ते लोक आपण आता शक्तीवान झाल्याचे अनुभवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या योजनेमुळे गावात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात ऐतिहासिक बदल होतील असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. आज तुमच्याकडे एक अधिकार आहे, एक कायदेशीर दस्तावेज आहे. त्यानुसार हे घर तुमचे आहे आणि ते तुमचेच राहणार आहे, हे निश्चित होणार आहे. ही योजना आपल्या देशातील गावांमध्ये एक ऐतिहासिक बदल करणार आहे, असे मोदी म्हणाले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे, असे मोदी म्हणाले. स्वामित्व योजना, गावात राहणाऱ्या आमच्या बंधु-भगिनींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. या योजनेमुळे गावातील मालकीहक्कांबाबतचे सुरू असलेले वाद संपुष्टात येतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. वाचा- 'गावांना नशिबावर सोडले होते' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात काँग्रेस पक्षावरही हल्लाबोल केला. भारताचा आत्मा गावातच असतो असे कितीही म्हटले जात असले तरी देखील त्यावेळी गावांना नशिबावरच सोडण्यात आले होते. सर्व समस्या अडचणी गावांमध्येच होत्या. ६ दशकांपासून गावांत राहणारे कोट्यवधी लोक बँक खात्यांपासून वंचित होते. शौचायले नव्हती, गॅस कनेक्शन नव्हती, स्वत:ची घरे नव्हती. मात्र, आज गावातील लोकांकडे हे सर्व आहे, असे मोदी म्हणाले. वाचा- वाचा-