
मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेनेला लक्ष्य करणारे माजी खासदार यांनी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडं मोर्चा वळवला आहे. केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ( taunts ) केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्याला बहुतेक राजकीय पक्षांचा विरोध आहे. या कायद्याविरोधात शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत. या मुद्द्यावरून भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाने सत्ता सोडली आहे. त्यामुळं काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. कृषी कायद्याविरोधात जनमत संघटित करण्यासाठी राहुल गांधी सध्या पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. तिथं ट्रॅक्टर रॅली काढल्या जात आहेत. सभा घेतल्या जात आहेत. मात्र, काँग्रेसच्या या सभांमधून शेतकरी गायब असल्याचं चित्र आहे. तसं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. तोच धागा पकडून नीलेश राणे यांनी राहुल गांधींना टोला हाणला आहे. ' प्रमाणेच राहुल गांधी हे शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार आहेत. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी परदेशात होते. शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं,' असं नीलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा: राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी मागील वर्षी देशभरात रान उठवले होते. प्रत्येक व्यासपीठावर राफेलचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मोदी सरकारला बॅकफूटवर नेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी सरकारला क्लीन चिट दिली होती. तोच संदर्भ नीलेश राणे यांनी राहुल यांना टोला हाणताना दिला आहे. वाचा: