काहीसा दिलासा, अधिक काळजी! 'अशी' आहे करोनाची ताजी स्थिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 6, 2020

काहीसा दिलासा, अधिक काळजी! 'अशी' आहे करोनाची ताजी स्थिती

https://ift.tt/3iGCJ2E
नवी दिल्ली: देशात गेल्या २४ तासांमध्ये चे एकूण ६१ हजार २६७ नवे रुग्ण आढळले असून गेल्या २५ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच रुग्णांची संख्या इतकी घसरली आहे. म्हणजेच २५ ऑगस्टनंतर आज सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. २५ ऑगस्ट या दिवशी देशात ६० हजार ९७५ इतके रुग्ण आढळले होते. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत एकूण ८८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच देशात करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे ६६ लाख ८५ हजार ८२ वर. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७५ हजार ७८७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात करोनामुळे एकूण १ लाख ३ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६२ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. देशात करोना रुग्ण बरे होण्याचा दर ८४.७० टक्के इतका आहे. देशात सध्या करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १३.७४ टक्के इतकी आहे. देशात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ९ लाख १९ हजार २३ इतकी आहे. तर मृतूदर १.५४ टक्के इतका आहे. सध्या देशात पॉझिटीव्हीटीचा दर ५.६२ टक्के इतका आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये १० लाख ८९ हजार ४०३ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण ८ कोटी १० लाख ७१ हजार ७९७ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- भारतात करोनाच्या ८ कोटी चाचण्या पूर्ण झाल्या असून, भारताने गेल्या १० दिवसांमध्ये १ कोटी चाचण्या केल्या आहेत. जगात अमेरिकेनंतर भारत सर्वाधिक चाचण्या करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. मात्र, भारताची लोकसंख्या पाहता प्रति १० लाख चाचण्याच्या हिशोबाने चाचण्यांची संख्या कमीच आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-