अजयने गमावला भाऊ, फोटो शेअर करत म्हटलं- कुटुंब उद्ध्वस्त झालं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 7, 2020

अजयने गमावला भाऊ, फोटो शेअर करत म्हटलं- कुटुंब उद्ध्वस्त झालं

https://ift.tt/3iHasZA
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अनिल देवगन यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण देवगन कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. अजयने स्वत: ही माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना आणि त्याच्या आप्तेष्टांना दिली. अजयने आपल्या भावाचा फोटो शेअर केला. यासोबतच त्याने म्हटलं की, 'काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगनला गमावले. त्याच्या अचानक निधनाने आमचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं आहे.' साथीच्या रोगामुळे प्रेअर मीट करणार नाही अजयने पुढे लिहिले की, 'कुटुंब आणि मला त्याची उपस्थिती नेहमीच जाणवेल. तो नेहमीच लक्षात राहील. त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करा. साथीच्या रोगामुळे आम्ही खासगी प्रेअर मीटही न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.' अनेक सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली अजयच्या या ट्वीटवर त्याच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं. अनेकांनी भावाच्या आत्म्यास शांती मिळो असा संदेशही लिहिला. फक्त चाहतेच नाही तर अभिषेक बच्चन, बोनी कपूर, दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी यांना श्रद्धांजली वाहिली. या सिनेमांमध्ये दिसेल अजय देवगणच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे येऊ घातले आहेत. यात 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया', 'आरआरआर' सारख्या सिनेमांचा समावेश आहे.