भयंकर! पतीच्या हाताला चावली पत्नी; सासूला केसांना धरून फरफटत नेले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 12, 2020

भयंकर! पतीच्या हाताला चावली पत्नी; सासूला केसांना धरून फरफटत नेले

https://ift.tt/3nEbQQl
अहमदाबाद: घरात कडाक्याचं भांडण झाल्यानंतर पत्नीने पतीच्या हाताला करकचून चावा घेतला. ती इतक्यावरच थांबली नाही. तिने त्याला मारहाणही केली. तसेच सासूच्या केसाला धरून तिला फरफटत खोलीत नेले आणि तिथे तिला बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार गुजरातमधील अहमदाबादच्या नारनपुरा येथे घडला. ३४ वर्षीय महिलेने पतीच्या हाताला चावा घेतला आणि त्याच्या आईला मारहाण केली. तिच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी पतीने आणि त्याच्या पालकांनी स्वतःला घरातील खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर या महिलेने रागाच्या भरात घरातील फर्निचरची तोडफोड केली. ४० वर्षीय तरूण प्रल्हादनगर येथील एका विमा कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम करतो. नारनपुरा येथे तो राहतो. त्याने रविवारी नारनपुरा पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, घरातील क्षुल्लक कारणांवरून गेल्या दोन वर्षांपासून पत्नी छळ करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. पत्नीच्या सततच्या टोमण्यांमुळे माझ्या आईबाबांनी घर सोडले. ते वेगळे राहू लागले. या सगळ्याला ती माझ्या पालकांना जबाबदार धरते आणि त्यांच्याशी भांडण करते, असेही त्याने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी आरोपी महिला तिच्या सासू-सासऱ्यांच्या घरात घुसली. तिने त्यांना शिवीगाळ केली. पतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही तिने शिवीगाळ केली. त्यानंतर सासूच्या केसांना पकडून तिला फरफटत खोलीत नेले आणि मारहाण केली. त्याने आईला सोडवण्याचे प्रयत्न केले. तिने त्याच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर वडिलांनीही मध्यस्थी केली. त्यांनाही तिने मारहाण केली. अखेर तिच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी पती आणि सासू-सासऱ्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर सासऱ्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. नारनपुरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची सुटका केली. पती आणि सासू-सासऱ्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतल्यानंतर आरोपी महिलेने घरातील फर्निचरची तोडफोड केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मारहाणीत पती आणि त्याची आई जखमी झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्षभरापूर्वी पत्नीने त्याच्यासह आई-वडिलांविरोधात खोटी तक्रार केली होती, असेही त्याने पोलिसांना सांगितले.