पडदा उघडला ; कॉर्पोरेट घोटाळेबाजांचे कारनामे अखेर वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 6, 2020

पडदा उघडला ; कॉर्पोरेट घोटाळेबाजांचे कारनामे अखेर वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर

https://ift.tt/3nmyf4E
नवी दिल्ली : भारतीय कॉर्पोरेट्समध्ये घडलेल्या बड्या आर्थिक घोटाळ्यांवर आधारित नेटफ्लिक्सच्या ( ) ' ( : India) या वेबेसिरीजची तीन एपिसोड अखेर सोमवारी रिलीज झाले . बदनामीचे कारण पुढे करत ही वेबसिरीज प्रदर्शित करून नये, यासाठी रामलिंग राजू, मेहुल चोक्सी, सुब्रतो रॉय यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र अखेर नेटफ्लिक्सला तीन भाग प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली. दि बॅड बॉय बिलेनरिज : इंडिया' (The Bad Boy Billionaires : India) या वेबसिरीजमध्ये सत्यम कॉम्प्युटर्स घोटाळ्याचा सूत्रधार बी. रामलिंग राजू, किंगफिशर एअरलाईन्सचा विजय मल्ल्या, सहारा समूहाचे सुब्रतो रॉय , पीएनबी घोटाळ्याचा आरोपी फरार मेहुल चोक्सी यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांवर बेतलेले कथानक आहे. नेटफ्लिक्सने (Netflix) सोमवारी अॅपवर या वेबसिरिजचे तीन भाग प्रदर्शित केले. ज्यात सत्यम कॉम्प्युटर्स घोटाळ्यात ७ वर्षांची शिक्षा झालेल्या बी. रामलिंग राजूवर आधारित एक एपिसोड आहे. राजूला २०१८ मध्ये जामीन मिळाला होता. त्याने ही वेबसिरीज प्रदर्शित होऊ नये म्हणून हैद्राबादमधील न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यात वेबसिरीज प्रदर्शनाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र राजूवर बेतलेल्या शो प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. दुसरे दोन भाग हे विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनी केलेल्या कॉर्पोरेट स्कॅमवर आधारित आहेत. दोघेही सध्या प्रत्यार्पण खटल्यात न्यायालयीन लढाई लढत आहेत. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोक्सी यानेही दिल्ली उच्च न्यायालयात याच वेबसिरीज विरोधात याचिका दाखल केली आहे. यावर उच्च न्यायालयाने ही वेब सिरीज चोक्सीला याआधी दाखवावी, असे आदेश नेटफ्लिक्सला दिले होते. दरम्यान सुब्रतो रॉय यांनी देखील वेबसिरीजवर हरकत घेत बिहारमधील न्यायालयात नेटफ्लिक्सला खेचले आहे. नेटफ्लिक्सने सुब्रतो रॉय यांचे नाव वापरून वेबसिरीज काढली आहे. यावर बिहार न्यायालयाने नेटफ्लिक्सला वेबसिरीज प्रदर्शित करण्यास मनाई केली होती. त्याला नेटफ्लिक्सकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. गेल्या शनिवारी अरारिया जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत कोर्टाने वेबसिरीज प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र काल सोमवारी हे निर्बंध उठवण्यात आले. त्यामुळे वेबसिरीज प्रदर्शनाचा नेटफ्लिक्सचा मार्ग मोकळा झाला.