हाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 1, 2020

हाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

https://ift.tt/2HGAgrT
बुलंदशहर: येथील बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह देशभरात संताप व्यक्त होत असतानाच, बुलंदशहरमध्येही बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. घरात झोपलेल्या १३ वर्षीय मुलीचे केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. येथील ककोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी रिझवानला त्याच्या गावाजवळून अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी सांगितले की, ककोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पोलिसांनी आरोपी रिझवान याला गावाजवळ अटक केली. तक्रारीनुसार, ती बुधवारी रात्री घरात झोपलेली होती. त्याचवेळी रिझवान उर्फ पकौडी घरात घुसला. त्याने तोंडावर रुमाल लावला आणि घरातून पळवून नेले. घरापासून दूर असलेल्या एका ट्रकजवळ नेले आणि तेथे बलात्कार केला. आरडाओरड करू नये म्हणून आरोपीने तोंडात रुमाल कोंबला होता. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे कुटुंबीयांना कळताच त्यांनी शेजाऱ्यांसह शोध घेतला. पीडिता ट्रकजवळ होती. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांना कळवले. पोलीस येण्याआधीच आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याची सुटका केली आणि त्याला पळून जाण्यास मदत केली, असे कुटुंबीयांनी सांगितले. घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केली. पीडितेच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल केला, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले.