नवी दिल्ली: पंतप्रधान (PM Narendra Modi) यांच्यासाठी अमेरिकेत तयार झालेले विशेष विमान बोइंग- ७७७ () आज भारताच्या भूमीवर उतरणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअरफोर्स वनप्रमाणे क्षमता असलेल्या या विमानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पंतप्रधानांव्यतिरिक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील या विमानाचा वापर करणार आहेत. आतापर्यंत पंतप्रधान इंडिया वन असे कॉल साइन असलेले बोइंग-७४७ चा वापर करत आले आहेत. आज कोणत्याही क्षणी हे विमान भारतात येईल अशी सूत्रांची माहिती आहे. (pm narendra modi air india one is arriving today at delhi international-airport) उत्तमोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त आहे विमान ने (Air India One) एकदा इंधन भरल्यानंतर अमेरिकेतून ते थेट भारतात सलग प्रवास करणार आहे. ही दोन नवी सुपर व्हीआयपी विमानाला भविष्यात एअर इंडिया नाही, तर हवाईदल हाताळणार आहे. या विमानाचे कॉल साइन एअरफोर्स वन असे ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. रंगापासून ते सुरक्षेपर्यंतची विशेष काळजी या विमानात तीन प्रकारच्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. यातील दोन रंग हे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या एअरफोर्स वनशी मिळते-जुळते आहेत. बोइंग-७७७ मध्ये पांढरा, फिकट निळा आणि नारंगी रंगाचा वापर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. फिकट निळा रंग आणि पांढरा रंगाचा वापर सर्वाधिक करण्यात आला आहे. तर नारंगी रंगाने विमानालच्या मध्यमागी रेषा ओढण्यात आली आहे. हे विमान अतिशय सुंदर दिसत आहे. ताशी ९०० किमीच्या वेगाने उडू शकते विमान अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे विमान एअरफोर्स-वन हे ३५ हजार फूटांच्या उंचीवर ताशी १ हजार १३ किमीच्या वेगाने उडू शकते. एकाच वेळी हे विमान ६ हजार ८०० मैलाचे अंतर पार करू शकते. हे विमान जास्तीतजास्त ४५ हजार १०० फूटांच्या उंचीवर उडू शकते. या विमानाच्या उड्डाणादरम्यान ताशी १,८१,००० डॉलर (सुमारे १ कोटी ३० लाख रुपये) इतका खर्च येतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे विमान ताशी ९०० किमीच्या वेगाने उड्डाण करणार आहे. या विमानात हवेत इंधन भरण्याची देखील क्षमता आहे. क्लिक करा आणि वाचा- विमानाची किंमत आणि शक्ती जाणून घ्या या विमानाची किंमत ८,४५८ कोटी रुपये इतकी आहे. अतिशय सुरक्षित समजले जाणाऱ्या या विमानाच्या दुसऱ्या भागात जॅमर बसवण्यात आले आहे. यामुळे शत्रूंच्या रडारचे सिग्नल जॅम होतात. या विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा देखील परिणाम होत नाही. या विमानात हवेत इंधन भरण्याची देखील क्षमता आहे. हे विमान अमेरिके ते भारत असा सलग प्रवास करू शकते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-