चेन्नई संघाच्या IPL मध्ये १ हजार षटकार; पहिल्या क्रमांकावर हा संघ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 3, 2020

चेन्नई संघाच्या IPL मध्ये १ हजार षटकार; पहिल्या क्रमांकावर हा संघ

https://ift.tt/2HShspU
दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामातील १४व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने () चा सात धावांनी पराभव केला. चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव असला तरी या सामन्यात त्यांनी एक खास विक्रम केला आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १ हजार मारण्याचा टप्पा पार केला. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चार संघांनी अशी कामगिरी केली आहे. वाचा- हैदराबादविरुद्ध चेन्नईकडून ५ षटकार मारले गेले. त्यापैकी रविंद्र जडेजा आणि सॅम करनने प्रत्येकी दोन तर धोनीने एक मारला. या पाच षटकारांसह त्यांचे आयपीएलमध्ये एक हजार २ षटकार झालेत. चेन्नईसह किंग्ज इलेव्हन पंजाबने देखील इतकेच षटकार मारले आहेत. हे दोन्ही संघ एकाच स्थानावर आहेत. वाचा- आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या नावावर आहे. त्यांनी आतापर्यंत १ हजार १४७ षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने १ हजार १३४ षटकार मारले आहेत. चेन्नई आणि पंजाब एक हजार २ षटकारांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर तर कोलकाता ९४८ षटकारांसह चौथ्या, ९०० षटकारांसह दिल्ली पाचव्या तर ५४४ षटकारांसह हैदराबाद अखेरच्या स्थानावर आहे. वाचा- IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे संघ RCB- १ हजार १४७ MI- १ हजार १३४ CSK- १ हजार ००२ KXIP-१ हजार ००२ KKR- ९४८ DC- ९०० RR- ७२२ SRH- ५४४ ही आकडेवारी आयपीएलच्या १३व्या हंगामातील १४व्या सामन्यापर्यंतची आहे. स्पर्धेत या वर्षी अनेक सामने होणार आहेत. त्यामुळे त्याच बदल होण्याची शक्यता आहे.