नरसिंहपूर: मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे देखील उत्तर प्रदेशातील हाथरससारखीच संतापजनक घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. नरसिंहपूर जिल्ह्यात एका दलित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित महिला ४ दिवस तक्रार दाखल करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. उलट पोलिसांनी पीडितेलाच शिवीगाळ करत पैसे मागितले. त्यानंतर निराश झालेल्या पीडितेने शुक्रवारी फाशी घेत आत्महत्या केली. हे प्रकरण सगळीकडे पसरू लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याच आदेश दिले. या व्यतिरिक्त एफआयआर दाखल करून न घेणाऱ्या पोलिस ठाण्याच्या प्रभाऱ्याविरोधात तक्रार नोंदवून त्याला अटक करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ही संतापजनक घटना २८ डिसेंबरला घडली. नरसिंहपूरमधील रिछाई या गावात राहणारी शेतात हवत कापण्यासाठी गेली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या तीन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबाबत तक्रार नोंद करण्यासाठी गोटिटोरिया चौकी आण चीचल पोलिस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी आपली तक्रार दाखल करून घेतली नाही, अशी पीडित महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या वागणुकीला कंटाळून शेवटी पीडित महिलेने आत्महत्या केली. पोलिसांनी प्रथम पीडित महिलेला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडित महिला वैद्यकीय रिपोर्ट घेऊन पोलिस ठाण्यात गेली असता तिच्या कुटुंबीयांना ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर पीडितेला शिवीगाळ करण्यात आली आणि पैसे दिले तर कुटुंबीयांना सोडून देऊ असे पोलिसांनी सांगितल्याचा पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी आमच्याच विरोधात कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची तक्रार पीडितेचे पती आणि सासऱ्यांची तक्रार आहे. क्लिक करा आणि वाचा- महिलेच्या आत्महत्येनंतर सामूहिक बलात्काराची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, एक आरोपी फरार आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-