मोबाइल काढण्यासाठी विद्यार्थ्याला शौच खड्ड्यात उतरवले; मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 18, 2021

मोबाइल काढण्यासाठी विद्यार्थ्याला शौच खड्ड्यात उतरवले; मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

https://ift.tt/3bYqaiV
जोहान्सबर्ग: शौच खड्ड्यात पडलेला मोबाइल बाहेर काढण्यासाठी ११ वर्षीय विद्यार्थ्याला बळजबरीने खड्ड्यात उतरवणाऱ्या मुख्याध्यपकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय या मुख्यध्यापकाला निलंबितही करण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केप पूर्व प्रांतातील लुथूथू माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. मुख्याध्यापक लुबेको मगानडेला यांचा मोबाइल फोन शाळेच्या शौचकूपात पडला होता. हा फोन काढण्यासाठी ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला रश्शीने बांधून शौच खड्ड्यात पाठवले. या विद्यार्थ्याला फोन मिळाला नाही. मात्र, त्याच्या शरीराला शौच खड्ड्यातील घाण लागली होती. मुख्यध्यापकाने या कामासाठी विद्यार्थ्याला २०० रँड (१३ डॉलर) देण्याचे कबूल केले होते. मात्र, त्याला फक्त ५० रँडच देण्यात आले. वाचा: वाचा: या महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. या मुख्यध्यापकाला अटक करण्यात आली असून नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरू करण्यात आल्यामुळे आपण समाधानी असल्याचे प्रतिक्रिया त्या विद्यार्थ्याच्या आजीने दिली आहे. वाचा: दक्षिण आफ्रिकेतील ग्रामीण आणि गरिब भागात अजूनही शौच खड्ड्यांचा वापर करण्यात येतो. याआधी दक्षिण आफ्रिकेत शौच खड्ड्यात पडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. वर्ष २०१४ व २०१८ मध्ये ही घटना घडली होती. देशातील जवळपास ३८०० शाळांमध्ये शौच खड्ड्यांचा वापर केला जातो.