टचस्क्रीन फोनमुळे सुरू झाली सुष्मिता सेन- रोहमन शॉलची लव्ह स्टोरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 19, 2020

टचस्क्रीन फोनमुळे सुरू झाली सुष्मिता सेन- रोहमन शॉलची लव्ह स्टोरी

https://ift.tt/35HwsAc
मुंबई- आणि रोहमन शॉलच्या जोडीची नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. प्रेमात वय पाहिलं जात नाही हे म्हणतात ते काही उगाच नाही. सुरुवातीला जेव्हा सुष्मिता आणि रोहमनच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा बरीच चर्चा झाली होती. याचं एक मुख्य कारण म्हणजे दोघांच्या वयामध्ये असणारं अंतर. रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. असं असलं तरी या दोघांची केमिस्ट्री पाहून प्रेमात वय आड येत असेल असं कधीच वाटणार नाही. आज सुष्मिता सेन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या खास दिवशी रोहमनला ती कधी आणि कशी भेटली, त्यांच्या लव्ह स्टोरी कशी सुरू झाली ते जाणून घेऊ.. फॅशन शो नाही तर इन्स्टाग्रामवरून सुरू झाली लव्ह स्टोरी अनेकांना अजूनही असं वाटतं की रोहन आणि सुष्मिताची ओळख फॅशन शो दरम्यान सुरू झाली. पण तसं नसून एका टच स्क्रीन फोनमुळे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. स्वतः सुष्मिताने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. रोहमनने सुष्मिताला इन्स्टाग्रामवर डीएम मेसेज केला होता. पण सुष्मिता इन्स्टाग्रामवरचे कोणतेच मेसेज वाचत नाही. आजही तिच्या मेसेज बॉक्समध्ये हजारो मेसेज अनरिड आहेत. मेसेजना उत्तर दिलं तर लोकांना तिच्याशी संवाद साधण्याची परवानगी मिळेल असं वाटेल, याचमुळे ती कोणतेही मेसेज पाहत नाही. टचस्क्रीन फोनमुळे मेजेस उघडला गेला टच स्क्रीन फोनमुळे एकदा तिच्याकडून रोहमनचा मेसेज चुकून उघडला गेला. ती डीएम मेसेज स्क्रोल करत होती तेव्हा अचानक त्याच्या मेसेजवर क्लिक झालं. यानंतर सुष्मिताने त्याच्याशी चॅट करायला सुरुवात केली. यानंतर तिला जाणीव झाली की अनोळखी माणसाशी चॅट करायला नको होतं. सुष्मिताने नंतर चॅटिंग संपवताना त्याला मेसेज लिहिला की, 'तुझ्याशी बोलून आनंद वाटला. तुला जगातलं सर्व सुख मिळावं अशी मी प्रार्थना करते.' सुष्मिताचं उत्तर पाहून रोहनला खूप आनंद झाला. त्याने परत मेसेज टाकत तिला म्हटलं की, 'तुझा मेसेज पाहून मी इतका आनंदित झालो आहे की मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फक्त उड्या मारत आहे. मला विश्वास बसत नाहीए की तू मला उत्तर दिलंस.' सुरुवातीला रोहमनने लपवलेलं आपलं वय त्यावेळी सुष्मिता अमेरिकेला जात होती. हळू हळू दोघांची मैत्री वाढत गेली. यानंतर सुष्मिता परत आल्यानंतर तिने रोहमनला फुटबॉल खेळण्याची ऑफर दिली. सुष्मिताने सांगितलं, जेव्हा ती रोहमनला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिला असं जाणवलं जणू ती त्याला आयुष्यभरापासून ओळखत आहे. गंमत म्हणजे रोहमनने सुरुवातीला सुष्मितापासून स्वतःचं वय लपवलं होतं. पण आता तिचा विश्वास आहे की रोहमन फार समंजस आहे आणि गोष्टींना कोणत्याही परिस्थितीशी बांधून ठेवत नाही.