
मुंबई: 'ज्येष्ठ अनुभवी नेते यांच्या निधनाने कॉंग्रेसने 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती,' अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री यांनी व्यक्त केल्या आहेत. (CM Death) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झालं. पटेल हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतले नेते होते. अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी ते एक होते. संघटनात्मक पातळीवरील काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचा प्रभाव असे. एक उत्तम राजकीय स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेससह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस व महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे,' असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.