
मुंबई/ ठाणे: प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने () नेते आणि आमदार यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज, मंगळवारी सकाळी छापे मारले. सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील १० ठिकाणांची झाडाझडती घेण्यात येत आहे. सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सकाळीच ईडीने त्यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापेमारी केली. मुंबईसह ठाण्यातील एकूण १० ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे. प्रताप सरनाईक ह्यांच्या विहंग ग्रुप कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत.