
मुंबई: 'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाकडून तीव्र निषेध होत आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार यांच्यानंतर आता यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 'या सगळ्याचा हिशेब होणार,' असा इशारा त्यांनी दिला आहे. ( warns Thackeray Government) वाचा: राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून या सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या नीतेश राणे यांनी आजच्या संपूर्ण घडामोडींवर हिदींतून एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. 'सत्ता आज आहे, उद्या नाही. आज तुम्हारी है, कल हमारी होगी. फक्त एवढं लक्षात ठेवा. हिशेब तर होणारच, तोही व्याजासह,' असं नीतेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता आजही कायम आहे. आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे,' असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे. तर, महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेनं चालला आहे, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. 'लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा: