पिछाडीनंतर ट्रम्प यांची मुसंडी; 'या' राज्यांवर आहे नजर! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 4, 2020

पिछाडीनंतर ट्रम्प यांची मुसंडी; 'या' राज्यांवर आहे नजर!

https://ift.tt/2JAUV1G
वॉशिंग्टन: अमेरिका राष्ट्राध्यक्ष मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पिछाडीवर असणाऱ्या यांनी मुंसडी मारली आहे. बायडन यांच्यापेक्षा जवळपास शंभरहून अधिक इलेक्टोरल मतांनी पिछाडीवर असलेल्या ट्रम्प यांच्याकडे आता २०० हून अधिक मते झाली आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत काही राज्ये ही पारंपरीकदृष्ट्या डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिक पक्षांसाठी बालेकिल्ला समजली जातात. तर काही राज्यांचा कल कोणत्याही निवडणुकीत स्पष्ट नसतो. अशा राज्यांना 'स्विंग स्टेट' म्हणतात. अशी १२ राज्ये आहेत. त्यातील १२ पैकी १० राज्यांनी चार वर्षापूर्वी ट्रम्प यांच्या पारड्यात मतदाने केले होते. त्यामुळे या राज्यांच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. सध्या यातील बहुतांशी राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. त्यामुळे बायडन यांच्यासमोर अधिक आव्हान असणार आहेत. फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. फ्लोरिडामध्ये २९ इलेक्टोरल मते आहेत. वाचा: वाचा: वाचा: सध्या बायडन यांनी एरिजोना, मिनेसोटा, वर्जिनिया आणि कोलराडो या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर तब्बल आठ राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. ही आघाडी जवळपास पाच ते १० टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी विजयाचा विश्वास असल्याचे म्हटले आहे. यामध्ये टेक्सास (३८ इलेक्टोरल मते), मिशिगन (१६ मते), ओहायो (१८ मते) आणि पेन्सिलवेनिया (२० मते) या राज्यांचाही समावेश आहे.