ट्रम्प यांची कोर्टात धाव; तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 5, 2020

ट्रम्प यांची कोर्टात धाव; तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप

https://ift.tt/2I5zaGS
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संघर्ष आता कोर्टात पोहचला आहे. यांच्यावतीने तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. पेन्सिलवेनिया, जॉर्जिया आणि मिशिगन या राज्यांतील मतमोजणीवर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ही राज्ये अतिशय महत्त्वाची आहेत. जो बायडन यांनी मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतली आहे. पेन्सिलवेनिया आणि नेवादामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतले आहेत. मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी प्रचार निरीक्षकांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे. मात्र, दोन्ही उमेदवारांचे प्रतिनिधी, निरीक्षक मतमोजणी ठिकाणी हजर असल्याचे निर्दशनास आले असल्याचे असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. पेन्सिलवेनियामध्ये निवडणुकीच्या तीन दिवसानंतर प्राप्त झालेल्या मतांची मोजणी करता येऊ शकते का, या मुद्यावरही सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली असल्याचे ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे उपव्यवस्थापक जस्टीन क्लार्क यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पिछाडीबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे वर्चस्व असणाऱ्या सगळ्याच राज्यांमध्ये आम्ही आघाडीवर होतो. त्यानंतर मात्र, अचानकपणे आमची पिछेहाट होण्यास सुरुवात झाली. हे एका रात्रीत कसं काय शक्य होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही ही निवडणूक जिंकलो असून मतमोजणीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहोत. अमेरिकन जनतेसोबत धोका होत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. रिपब्लिक पक्षाला भरभरून मतदान करणाऱ्या लाखो मतदारांचे त्यांनी आभार मानले आहे. काहींनी आमच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नसल्याचे त्यांनी म्हटले. वाचा: ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बायडन यांच्या टीमने कोर्टातील लढाईस सज्ज असल्याचे म्हटले आहे. बायडन सध्या विजयाच्यानजिक आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यास ट्रम्प कोर्टात धाव घेतील अशी शक्यता निवडणुकीच्या आधीच वर्तवण्यात येत होती.