भाजप उमेदवाराच्या नातेवाईकाकडून २.३ कोटींची रोकड जप्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 2, 2020

भाजप उमेदवाराच्या नातेवाईकाकडून २.३ कोटींची रोकड जप्त

https://ift.tt/3mLPECu
हैदराबाद: हैदराबादमध्ये (Hyderabad) पोलिसांनी अवैध मार्गाने एका जागेवरून दुसऱ्या जागी पैसे पाठवणाऱ्या एका टोळीचा रविवारी पर्दाफाश केला. यात पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार एम. रघुनंदन राव () यांच्या एका नातेवाईकाकडे २.३ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली. ( seized 2 3 crore rupees cash from relative of ) या बाबत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) दोन लोकांना बेगमपेट परिसरात पकडले. हे दोघे एका वाहनातून रोकड घेऊन जात होते. है सर्व पैसे मतदारांना कथित स्वरुपात वाटण्यात येणार होते. या कारवाईत पोलिसांनी सुरभी श्रीनिवास राव (Surabhi Sriniwas Rao) या व्यक्तीला पकडले, सुरभी हा भाजप उमेदवार रघुनंदन यांचा नातेवाईक आहे. पोलिसांनी ३ नोव्हेंबरला दुब्बक विधानसेच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवणडणुकीच्या () तोंडावर ही रक्कम जप्त केली आहे. सुरभी श्रीनिवास राव दुब्बक विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटण्याच्या उद्देशाने ही रक्कम घेऊन जात होता, असे पोलिसांनी सांगितले. एका खासगी कंपनीच्या मॅनेजरने हा रक्कम आपल्याला दिल्याचे श्रीनिवास रावने कथित स्वरुपात सांगितले. या कंपनीचे मालक माजी खासदार आणि भाजप नते जी. वेंकटस्वामी हे आहेत. एनडीटीव्ही ने हे वृत्त प्रसारित केले आहे. क्लिक करा आणि वाचा बातमी: पोलिसांनी या पूर्वी २६ ऑक्टोबर या दिवशी रघुनंदन राव यांच्या एका नातेवाईकाच्या घरातून १२.८ लाख रुपयांची रोकडही जप्त केली होती. क्लिक करा आणि वाचा बातमी: क्लिक करा आणि वाचा बातमी: