'महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी का भिजले नाही?' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 2, 2020

'महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी का भिजले नाही?'

https://ift.tt/3mGVsxh
मुंबई: 'कर्नाटकात भाजपचे राज्य आहे व त्या राज्यात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले नाही हे त्यांनाच माहीत,' असा टोला शिवसेनेनं राज्यातील भाजप नेत्यांना हाणला आहे. ( criticises Maharashtra BJP Leaders) १ नोव्हेंबर हा कर्नाटकचा स्थापना दिन. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचाराचा निषेध या माध्यमातून केला जातो. दरवर्षीप्रमाणे कालही मराठी भाषिकांनी तिथं काळा दिवस पाळला. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राला डिवचणारं वक्तव्य केलं होतं. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून सवदी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तसंच, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनाही सुनावलं आहे. वाचा: 'सीमा भागातील जनतेला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी ‘काळा दिवस’ पाळला व दंडास काळ्या फिती बांधून काम केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील भाजपसह इतर राजकीय पक्षही सामील झाले असते तर मराठी ऐक्याचे जोरदार दर्शन कानडी राज्यकर्त्यांना घडले असते. निदान दोन विरोधी पक्षनेत्यांनी तरी दंडास काळ्या फिती बांधून मराठी जनांच्या भावनेचा मान राखायला हवा होता,' अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. 'कर्नाटकात भाजपचे राज्य आहे व त्या राज्यात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले नाही हे त्यांनाच माहीत,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. 'बेळगावसह मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यायलाच हवीत', असं वक्तव्य करणारे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे मात्र शिवसेनेनं आभार मानले आहेत. वाचा: