इवांका ट्रम्प यांनी नियम मोडले! मुलांना बदलावी लागली शाळा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 15, 2020

इवांका ट्रम्प यांनी नियम मोडले! मुलांना बदलावी लागली शाळा

https://ift.tt/3eYUPN1
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेतील शाळांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. मात्र, या नियमांचे उल्लंन केल्याचा फटका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी यांना बसला आहे. इवांका ट्रम्प आणि त्यांचे पती जेरेड कुश्नर यांना आपल्या तीनही मुलांना दुसऱ्या शाळेत दाखल करावे लागले आहे. वॉशिंग्टनमधील एका उच्चभ्रू शाळेत इवांका ट्रम्प यांची मुले मागील ३ वर्षांपासून शिक्षण घेत होते. इवांका आणि त्यांचे पती जेरेड यांनी अनेकदा पालकांसाठी जारी करण्यात आलेले करोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. इवांका ट्रम्प आणि त्यांच्या पतीने शाळेच्या पॅरेंट्स हॅण्डबुकमध्ये नमूद केलेल्या कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन केले नसल्याचे सीएनएनने म्हटले आहे. मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टेंसिंगचा वापर करण्याबाबतच्या सूचना इवांका आणि त्यांच्या पतीला देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर इवांका ट्रम्प यांना आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत दाखल करावे लागले. वाचा: वाचा: सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केली होती. इवांका आणि जेरेड हे पालकांसाठी असलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करत असल्याचे पालकांनी म्हटले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने इवांका आणि जेरेड यांना नियमांचे पालन करण्यास सांगितले. करोनाबाधितांची संख्या वाढत असताना इवांका आणि त्यांचे पती मास्कदेखील वापर नसल्यामुळे शाळा व्यवस्थापनाने चिंता व्यक्त केली होती. वाचा: वाचा: अमेरिका राष्ट्राध्यक्ष वादविवादात संपूर्ण ट्रम्प कुटुंबीय उपस्थित होते. त्यावेळीदेखील इवांका यांनी मास्कचा वापर केला नव्हता. इतकंच नव्हे तर ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना करोनाची बाधा झाल्यानंतरही इवांकाने स्वत:ला क्वारंटाइन केले नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील मास्क वापराच्या विरोधात दिसून आले. करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर व्हाइट हाउसमध्ये परतल्यानंतर ट्रम्प यांनी काही वेळेतच मास्क काढला होता.