
मुंबईः नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील तरुणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षानंही राज्य सरकारला पुन्हा एका महिला सुरक्षेततेच्या मुद्द्यावरून घेरलं आहे. भाजप नेते यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करत राज्य हाताळण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली आहे. भाजपनंही राज्य सरकारवर निशाणा साधत आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. तर, भाजप नेते यांनी थेट मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे. वाचाः 'बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्देवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कोणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत,' असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. वाचाः काय आहे प्रकरण? नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील अविनाश राजूरे याचे गावातील एका २२ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळी निमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीने पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील येलंबघाट जवळ अविनाशनं दुचारी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्यात नेऊन तिच्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून पसार झाला. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, पहाटेची वेळ असल्यानं कुणीही मदतीला येऊ शकले नाही. मोठ्या प्रमाणावर भाजलेली ही तरुणी तब्बल १२ तास रस्त्यालगत पडून होती. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहनधारकाला तिचा आवाज ऐकू आला. त्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.