शेअर बाजारात तेजी ; निफ्टी प्रथमच १३००० अंकावर , सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 24, 2020

शेअर बाजारात तेजी ; निफ्टी प्रथमच १३००० अंकावर , सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला

https://ift.tt/35W1419
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाट लावल्याने आज मंगळवारी आणि निफ्टीने आपली विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. सेन्सेक्स ३७५ अंकांनी वधारला असून निफ्टीने शतकी झेप घेतली आहे. निफ्टीने प्रथमच १३००० अंकांची पातळी ओलांडली आहे. करोना लशींच्या चाचण्या एकामागून एक यशस्वी होत आहेत. त्याचे वितरण कशा रीतीने होते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मात्र किमान चार कंपन्यांनी करोना प्रतिबंधात्मक लशींबाबत दावे केले आहेत. ज्यामुळे भांडवली बाजारात तेजीची लाट आली आहे. आज सकाळपासून बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला आहे. आयटी, ऑटो, बँका आणि वित्त संस्थांच्या शेअरला बाजारात मागणी आहे. सध्या एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, ऍक्सिस बँक, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस यासारखे महत्वाचे शेअर तेजीत आहे. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान एक लाख कोटींची भर पडली आहे. सध्या सेन्सेक्स ३७५ अंकांनी वधारला असून तो ४४४३२ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०७ अंकांनी वधारला असून तो १३०३४ अंकांवर आहे. बेंचमार्क निर्देशांकांनी सोमवारी सकारात्मक सुरुवात करत उच्च्चांकी स्थिती गाठली. आयटी आणि ऊर्जा स्टॉक्सनी नफा नोंदवला. आरबीआयच्या ताज्या शिफारशींनंतर प्रमुख वित्तीय स्टॉक्सना नकारात्मक अनुभव आले. निफ्टीने ६७.४० अंकांची वृद्धी घेत १२९२६.४५ वर विश्रांती घेतली. बीएसई सेन्सेक्स १९४.९० अंकांनी वाढला व ४४०७७.१५ अंकांवर स्थिरावला होता. कालच्या सत्रात ओएनजीसी ६.६३ टक्के, इंडसइंड बँक ३.७९ टक्के, गेल ३.५४ टक्के, डॉ.रेड्डीज ३.५१ टक्के आणि इन्फोसिस ३.१९ टक्के हे टॉप निफ्टी गेनर्स ठरले. एचडीएफसी ३.५० टक्के, आयसीआयसीआय बँक २.४९ टक्के, अॅक्सीस बँक १.७९ टक्के, एसबीआय लाइफ १.७५ टक्के आणि टायटन १.७३ टक्के हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. क्षेत्रीय आकडेवारीचा विचार करता, बँकिंग क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारले. आयटी आणि ऊर्जा स्टॉक्सनी वृद्धीचे नेतृत्व केले. बीएसई मिडकॅपने १.२५ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅपने १.३७ टक्के वृद्धी अनुभवली.