IND vs AUS: दुसऱ्या वनडेत देखील धुलाई,ऑस्ट्रेलियाने उभा केला ३८९ धावांचा डोंगर; १ शतक आणि चार अर्धशतके - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 29, 2020

IND vs AUS: दुसऱ्या वनडेत देखील धुलाई,ऑस्ट्रेलियाने उभा केला ३८९ धावांचा डोंगर; १ शतक आणि चार अर्धशतके

https://ift.tt/2VaJWP4
सिडनी: भाारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी केली. प्रथम फलंदाजीकरत त्यांनी ५० षटकात ४ बाद ३८९ धावा केल्या. पहिल्या सामन्या प्रमाणे या सामन्यात देखील स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी केली. तर कर्णधार एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर यांनी अर्धशतकी खेळी केली. वाचा- ... दुसऱ्या वनडेत कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंच आणि वॉर्नरने पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात करून दिली. यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागिदारी केली. फिंच ६० धावांवर बाद झाला त्याने ६९ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकार मारले. शमीने फिंचची विकेट घेतली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला श्रेयस अय्यरने ८३ धावांवर धावबाद केले. पण गेल्या सामन्यातील शतकवीर स्मिथने धावांचा वेग कमी केला नाही. स्मिथने भारताविरुद्ध सलग दुसरे शतक केले. त्याने फक्त ६२ चेंडूत १०० धावा केल्या. गेल्या सामन्यात देखील त्याने अशीच शानदार फलंदाजी केली होती. त्याला हार्दिक पांड्याने १०४ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्नस लाबुशानने अर्धशतक पूर्ण केले. वाचा- अखेरच्या षटकात लाबुशाने आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धावांचा वेग कायम ठेवत संघाला ३८९ धावांपर्यंत पोहोचवले. मॅक्सवेलने देखील अर्धशतकी खेळी केली. पहिल्या वनडे प्रमाणे या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात एक शतक आणि तब्बल चार अर्धशतकांची नोंद झाली. वाचा- भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजी मोहम्मद शमी- ९ ओव्हर ७३ धावा, १ विकेट जसप्रीत बुमराह- १० ओव्हर ७९ धावा, १ विकेट नवदीप सैनी- ७ ओव्हर ७० धावा युजवेंद्र चहल- ९ ओव्हर ६० धावा रविंद्र जडेजा- १० ओव्हर ६० धावा मयांक अग्रवाल- १ ओव्हर १० धावा हार्दिक पांड्या- ४ ओव्हर २४ धावा, १ विकेट