AUS vs IND 1st Test: विराट आणि शास्त्रींचा निर्णय चुकला; पृथ्वी शॉने विश्वास गमावला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 17, 2020

AUS vs IND 1st Test: विराट आणि शास्त्रींचा निर्णय चुकला; पृथ्वी शॉने विश्वास गमावला

https://ift.tt/3h1LXaj
सिडनी: AUS vs IND 1st Test ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फलंदाजीसाठी चांगले असल्याने विराटने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधाराच्या या निर्णयावर पृथ्वी शॉने पाणी फेरले. फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी असल्याने विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली धावसंख्या उभी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकता येइल हे विराटने बोलून देखील दाखवले. भारतीय डावाची सुरूवात आणि मयांक अग्रवाल यांनी केली. ऑस्ट्रेलियाकडून पहिली ओव्हर मिचेल स्टार्कने टाकली. त्याने दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉची बोल्ड घेतली. वाचा- पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून खराब फॉममध्ये आहे. आयपीएल त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सराव सामन्यात देखील तो धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्यानंतर देखील भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्या कसोटीत त्याला संधी दिली. काल पहिल्या कसोटीसाठी जेव्हा अंतिम ११ खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली तेव्हा त्यात पृथ्वीचे नाव पाहून अनेकांना धक्का बसला होता. सलामीवीर म्हणून पृथ्वी आणि शुभमन गिल यांच्यात स्पर्धा होती. पृथ्वीच्या तुलनेत गिलने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पृथ्वी खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याच्या ऐवजी गिलचा विचार करावा असे मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले होते. तरी देखील पृथ्वीवर विश्वास दाखवत त्याला पहिल्या कसोटी संधी दिली. पण ही संधी त्याने पुन्हा वाया घालवली. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध झालेल्या दोन सराव सामन्यात त्याने फक्त ६२ धावा केल्या होत्या. त्यातील ४० धावा या एका डावात केल्या होत्या. पृथ्वीच्या या अपयशानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.