
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या लढतीत विजय मिळून भारताला मालिका विजय मिळवण्याची संधी आहे. भारताने कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या लढतीत ११ धावांनी विजय मिळवला होता. Live अपडेट ( 2nd T20I)>> २ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या २३ धावा >> ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेड याच्याकडे >> ऑस्ट्रेलिया संघात ३ बदल- एरॉन फिंच, जोश हेजलवुड आणि मिशेल स्टार्क बाहेर>> भारतीय संघात तीन बदल- मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर, मनिष पांडेच्या जागी श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी >> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-२० लढतीत भारताने ११ धावांनी विजय मिळवला होता. >> तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे