
एडिलेड: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर शानदार गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर रोखले. पहिल्या डावात भारताने ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया live अपडेट ( 1st test 3rd day) >> भारताची अवस्था ९ बाद ३१ >> हनुमा विराही बाद, हेजलवूडने घेतली पाचवी विकेट >> आर अश्विन शून्यावर बाद, जोश हेजलवूड हॅटट्रिकवर>> वृद्धीमान साहा ४ वर बाद, भारताची सातवी विकेट >> विराट कोहील बाद, चार धावा करून बाद झाला >> भारताला पाचवा धक्का, अजिंक्य रहाणे शून्यावर बाद >> मयांक अग्रवाल ९ धावांवर बाद >> भारताला मोठा धक्का, चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद; कर्णधार विराट कोहली मैदानात >> नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह २ धावांवर बाद, भारताची दुसरी विकेट >> तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात