करोना: देशभरात करोना रुग्णांच्या रोजच्या वाढीत घट, आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 10, 2020

करोना: देशभरात करोना रुग्णांच्या रोजच्या वाढीत घट, आणि...

https://ift.tt/3n9Zora
नवी दिल्ली: भारतात करोनाची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९७ लाख ६७ हजारहून अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने () आज गुरुवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांमध्ये ३१ हजार ५२१ नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात करोनामुळे आतापर्यंत एकूण १ लाख ४१ हजार ७७२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जगभरातील १८० हून अधिक देश करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रुग्णसंख्या लक्षात घेता भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. () आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ३७ हजार ७२५ रुग्ण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण ९२ लाख ५३ हजार ३०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या मुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट दिसत आहे. देशात एकूण ३ लाख ७२ हजार २९३ इतके सक्रिय म्हणजेच ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे रुग्ण आहेत. देशात करोनाचा रिकव्हरी रेट, अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर ९४.७३ टक्के इतका आहे, तर ससर्ग झालेल्यांमध्ये सक्रिय रुग्ण ३.८१ टक्के इतके आहेत. तर मृत्युदर १.४५ टक्के आणि पॉझिटीव्हीटीचा दर अर्थात चाचणीदरम्यान करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा दर ३.४१ टक्के इतका आहे. चाचणीविषयी बोलायचे झाल्यास गेल्या २४ तासांमध्ये एकूण ९ लाख २२ हजार ९५९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण १५ कोटी ०७ लाख ५९ हजार ७२६ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या. क्लिक करा आणि वाचा- गेल्या २४ तासांत वाढलेले नवे रुग्ण- ३१,५२१आतापर्यंत लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या- ९७,६७,३७१ क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-