दुर्दैवी! ठाण्यात सेप्टिक टँकमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 22, 2020

दुर्दैवी! ठाण्यात सेप्टिक टँकमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू

https://ift.tt/2KGte89
ठाणे: ड्रेनेजच्या सेप्टिक टँकमध्ये पडून एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथील शिमला पार्क परिसरात घडली. नऊ वाजताचा प्रकार घडला असून, खेळत असताना मुलगा सेप्टिक टँकमध्ये पडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुलाचे वय सहा वर्षे आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सेप्टिक टँकमध्ये पडल्यानंतर या मुलाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेबाबत रात्री नऊच्या सुमारास माहिती मिळाली. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी मुलाचा शोध घेतला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित केले.