काय सांगता! ग्रामीण महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन अधिक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

काय सांगता! ग्रामीण महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन अधिक

https://ift.tt/2KQdFdY
Mustafa.Attar@timesgroup.com Tweet : @mustafaattarMT पुणे : राज्यातील पंधरा वर्षावरील प्रौढांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागातील पुरुषांमध्ये ३३.८ टक्के तंबाखूचे आणि १३.९ टक्के अल्कोहोलचे आहे. १०.९ टक्के महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन असले तरी, अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील महिलांमध्ये सेवन अधिक असल्याचेही दिसून आले आहे. 'राष्ट्रीय कुटंब आरोग्य सर्वेक्षणां'तर्गत राज्यातील अॅनिमिया, कर्करोग, रक्तदाब आदी आजारांबाबत माहिती घेण्यात आली. राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण महिलांमध्ये तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. शहरात ६.६ टक्के तर, ग्रामीण भागात १४.७ टक्के महिला तंबाखूच्या आहारी गेल्या आहेत. पुरुषांचा विचार केला असता, राज्यात आजमितीला ३३.८ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात. पैकी ४०.६ टक्के ग्रामीण पुरुष आणि २६.२ टक्के शहरी पुरुष तंबाखूचे सेवन करतात. १३ टक्के शहरी आणि १४.७ टक्के ग्रामीण पुरुषांना अल्कोहोल घेण्याची सवय आहे. उच्च रक्तदाब असल्याने २४.४ टक्के पुरुषांना आणि २३.१ टक्के महिलांना नियंत्रणासाठी औषधे घ्यावी लागतात. ग्रामीण भागापेक्षा शहरातील स्त्री-पुरुषांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी १२.४ टक्के महिलांना आणि १३.६ टक्के पुरुषांना मधुमेह झाल्याचेही निदान करण्यात आले आहे. मुलींच्या बालविवाहात घट वय वर्षे अठरापेक्षा कमी वयात विवाह झालेल्या राज्यातील महिलांचे प्रमाण २००५-०६मध्ये २६.३ टक्के होते. हे प्रमाण आता २१.९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. शहरामध्ये हेच प्रमाण १५.७ टक्के असून, ग्रामीण भागातील प्रमाण २७.६ टक्के आहे. नवजात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात किंचित सुधारणा झाली आहे. असे 'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण' अहवालातून स्पष्ट झाले आहे. ८४.६ टक्के शिक्षित महिला ९३ टक्के शिक्षित पुरुष ३८ टक्के इंटरनेट वापरणाऱ्या महिला ६१.५ टक्के इंटरनेट वापरणारे पुरुष