शिवसेना नेत्यांची राम मंदिरावरील विधाने दुर्दैवी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

शिवसेना नेत्यांची राम मंदिरावरील विधाने दुर्दैवी

https://ift.tt/2Jdjsdg
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या, हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. पण आता शिवसेनेचे नेते राम मंदिरावर चुकीची विधाने करीत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. वारकरी साहित्य परिषद आयोजित नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य सांगता समारंभ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राला सांप्रदायिक परंपरा आहे. समाजाचे प्रबोधन करण्याचे काम गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील धुरिणांनी केलेले आहे. वारकरी साहित्य परिषद ही वारकरी संप्रदायांना एकत्रित करून संप्रदायाचे साहित्य निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. संप्रदायाच्या माध्यमातून परमार्थिक वारसा जपण्याचे सर्वांगीण काम संत साहित्य संमेलनात होत असते. हिंदुत्वाचा भगवा पुढे नेण्याचे व टिकविण्याचे काम ही संप्रदायी मंडळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन करीत आहेत.