
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० प्रकारात भारतीय संघाची कामगिरी खुप चांगली आहे. आकडेवारीत बोलायचे झाले तर गेल्या ९ टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरा येथे झालेल्या सामन्यात भारताने सलग नववा विजय मिळवला. या ९ लढतीपैकी दोन लढती भारताने सुपर ओव्हरमध्ये मिळवल्या होत्या. त्यामुळे भारताचा पराभव झालाच नाही. आता आज रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसरी टी-२० लढत होणार आहे. यात लढतीत भारतीय संघाला पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आज रविवारी होणाऱ्या लढतीत भारताने विजय मिळवल्यास तो पाकिस्तानला मागे टाकू शकतो. पाकिस्तानने २०१८ साली सलग ९ टी-२० लढतीत विजय मिळवला होता. पण यातील कोणतीही लढत सुपर ओव्हरमध्ये झाली नव्हती. जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या काळात पाकिस्तानने झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांचा दोन वेळा पराभव केला होता. तर न्यूझीलंडचा युएईमध्ये पराभव केला. वाचा- भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पाकिस्तान संघाच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा भारतीय संघाचा देखील सलग सर्वात जास्त टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षी डिसेंबरपासून एकही टी-२० लढत गमावलेली नाही. भारताने डिसेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडिजचा मुंबईत पराभव केला होता. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये श्रीलंकेचा इंदुर आणि पुण्यात पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंडचा त्यांच्याच देशात सलग ५ टी-२० लढतीत पराभव केला. यातील दोन लढती सुपर ओव्हरमध्ये जिंकल्या होत्या. या लढतींपैकी लंकेविरुद्धची ५ जानेवारी २०२० रोजीची लढत कोणताही चेंडू न फेकता रद्द झाली होती. वाचा- सलग सर्वाधिक टी-२० लढती जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २०१८ ते २०१९ या काळात सलग १२ टी-२० लढतीत विजय मिळवला आहे. त्यानंतर देखील दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो त्यांनी २०१६ ते २०१७ या काळात सलग ११ सामन्यात विजय मिळवला आहे.