पटणा- विद्यार्थ्याच्या अॅडमिट कार्डवर त्याच्या वडिलांच्या नावाऐवजी इम्रान हाश्मीचं नाव लिहिल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे आता इम्राननेही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या २० वर्षाच्या मुलाच्या अॅडमिट कार्डवर आईचं नाव म्हणून सनी लिओनीचं नाव आहे. सध्या याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेड लाइट परिसराचा लिहिला पत्ता, विद्यापीठ करत आहे तपास या बातमीवर ट्वीट करताना इम्रानने लिहिले की, 'मी शपथ घेऊन सांगतो की हा मुलगा माझा नाही.' या प्रकरणात इम्रानचे चाहते प्रतिक्रिया देऊन त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. दरम्यान विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर घरच्या पत्त्यावर चतुरबाज स्थान असं लिहिलं आहे. रिपोर्टनुसार, हा परिसर रेड लाइट परिसर म्हणून ओळखला जातो. विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक केल्याचं म्हटलं जात आहे. निबंधक म्हणाले, चौकशीनंतर केली जाईल कारवाई विद्यापीठाचे कुलसचिव राम कृष्णा यांनी पीटीआयला सांगितलं की, आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. अर्थात, ही विद्यार्थ्यांचीच खोड आहे आणि योग्य त्या चौकशीनंतर संबंधीतांवर कारवाई केली जाईल.